पैठण, (प्रतिनिधी): दक्षिण काशीतील पैठण क्षेत्री श्री संत एकनाथ महाराज यांचा ४२७ वा जलसमाधी उत्सव सोहळ्यास ५ मार्च तुकाराम बीजेच्या शुभ पर्वावर गावातील नाथ मंदिरातील श्रीखंड्या रांजन पुजनाने झाली.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी रघुनाथ बुवा गोसावी, ज्ञानेश बुवा गोसावी, योगेश बुवा गोसावी, पुष्कर गोसावी, रावसाहेब बुवा गोसावी, उल्का गोसावी, अपूर्वा गोसावी, श्रीनिधी गोसावी, माधुरी पांडव, रवींद्र पांडव, रेखा कुळकर्णी, श्रीकृष्ण कुळकर्णी, माधव भाले, घनश्याम नाईक, प्रकाश नाईक, हरिभाऊ जोशी, प्रमोद कोळेश्वर, सुरेश जोशी, सुवर्णा उपाध्याय, मंगल नाईक, किशोर तांगडे, दिनेश पारिक अदि भाविक उपस्थित होते.
-- रांजण भरण्यास दोन ते तीन दिवस लागतात --
हा रांजण भरण्यास दोन ते तीन दिवस लागतात. बहुधा हा रांजण चतुर्थदशीला भरतो. ज्या भक्ताच्या हस्ते रांजण भरतो. त्या भक्ताचा सत्कार केला जातो. गावातील नाथ मंदिरातील हा रांजण दगडी असुन तो २१ फुट खोल असून उत्तर दक्षिण ६ फुट तर पूर्व पश्चिम ८ फुट असा आहे. जवळपास २० हजार लिटर पाणी यात मावते. रांजणाच्या तळाशी दगडी विठ्ठल मूर्ती नाथांनी स्थापन केलेली आहे. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्या हे नाव धारण करून नाथांच्या वाड्यावर सेवेचे काम १२ वर्षे बजावले.
नाथांच्या घरी दररोज अन्नदानाच्या पंगती उठत त्यासाठी पाणी कमी पडू नये म्हणून गोदावरीवरून पाणी आणुन नाथ वाड्यातील रांजण भरण्यासाठी श्रीखंड्या सदैव तत्पर राही. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्या नाव धारण करून नाथ वाड्यावर सेवा बजावल्याची अनुभूती नाथांना आल्यावर त्याना सुखद आनदाचा धक्का बसला पण आपल्या वाड्यावर देवाने वाटेल ते काम करण्याची सेवा बजावल्यानंतर नाथ अस्वस्थ झाले. पुरोहित चंद्रशेखर उपाध्ये, रवींद्र साळजोशी चक्रे देवा, सेवणकर देवा यांच्यासह ११ पुरोहितांच्या मंत्रघोषात दुपारच्या सत्रात रांजण पुजा संपन्न झाली. त्यानंतर रांजणात पाणी टाकण्यास सुरुवात करून नाथषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.












